सुबोध भावे आणि मायदेश मिडिया सादर करत आहे "आटपाडी नाईट्स"
आपल्या "आटपाडी नाईट्स" सिनेमाबद्दल :
हा सिनेमा शेवटी एक संदेश देतो, मुख्यत्वे गावागावातील तरुण मुले जी मोबाइल, इंटरनेट, अश्लील सिनेमे यांच्या आहारी जाऊन चुकीच्या किंवा अर्धवट माहितीने स्वताचे नुकसान करुन घेतात, त्यांच्यासाठी हा सिनेमा काही महत्वाचे शिकवून जातो, त्यांना विचार करायला लावतो आणि म्हणून हा सिनेमा 15, 16 वयोगटापासून सर्वानी बघायला हवा. विनोदी अंगाने होणाऱ्या मनोरंजनातून हा चित्रपट आजच्या तरुण पिढीस काही महत्वाचे सांगत आहे, त्यातच याचे यश आहे. चित्रपटाच्या निर्मिती मागे काही चांगली उदिष्टे असावी, प्रबोधन असावे कारण ते समाजात सहज पोहचते .
सम्पूर्ण चित्रपटात कोठेही अश्लील दृश्ये वा संवाद नाहीत. अंगप्रदर्शन नाही.